Jump to content

Page:Konkani Vishwakosh - Volume 4 Released.pdf/1023

From Wikisource
This page has not been proofread.

जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचे ।
दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछिल तो तें लाहो । प्राणि जात ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गांव |
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरूरवीं । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविजे । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टा दृष्ट्विजयें । हो आवें जी ॥
येथ म्हणो विश्वेशरा वो । हा होईल दानपसावो ।
यणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥

- कों. वि. सं. मं.